जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अपघातस्थळी दाखल होऊन मदतकार्य केले - दैनिक शिवस्वराज्य

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अपघातस्थळी दाखल होऊन मदतकार्य केले

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर- पहूर रस्त्यावर शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज घडली. घटनेची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनचालक किरकोळ जखमी झाला असून, गाडीतील शेतमालाचे नुकसान झाले आहे. मंत्री महाजन यांनी जखमी चालकाची विचारपूस करून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.या प्रसंगी महाजन यांनी चालकाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads