जामनेरात झाडाला मोटारसायकल धडकल्यानेे भीषण अपघात, शास्त्री नगर भागातील तरुण गंभीर जखमी
जामनेर: हीवरखेडा रस्त्यावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने जामनेर हादरले आहे. शास्त्री नगर भागातील रहिवासी मनोज बाविस्कर (भज्जी) हे मोटारसायकलवरून प्रवास करत असताना वाहनाचा ताबा सुटून त्यांच्या मोटारसायकलने झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांनी वेगवान कार्यक्षमता दाखवत मनोज बाविस्कर यांना उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे पोहोचवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघाताने शास्त्री नगर भागात खळबळ उडाली असून नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा