गंभीर अपघातातील तरुणाचा वाटेतच मृत्यू, जामनेरमध्ये शोककळा - दैनिक शिवस्वराज्य

गंभीर अपघातातील तरुणाचा वाटेतच मृत्यू, जामनेरमध्ये शोककळा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर: शास्त्री नगर भागातील रहिवासी मनोज बाविस्कर (भज्जी) यांचा मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हीवरखेडा रस्त्यावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारसायकल झाडाला धडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते.अपघातानंतर तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.मनोज बाविस्कर हे परिसरातील तरुणांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads