चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पहुर पोलिसांची धडाडीची कामगिरी... - दैनिक शिवस्वराज्य

चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पहुर पोलिसांची धडाडीची कामगिरी...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
दि ७ जामनेर तालुक्यातील पहुर कसबे भागातील राहिवासी अनिल रिखबदास कोचेटा यांच्या घरातील चोरीस गेलेला 16लाख 90हजार 578रुपये किमतीचा ऐवज(सोने -चांदीचे दागिने )आज दि. 7रोजी पहुर पोलीस ठाण्यात फिर्यादी अनिल कोचेटा यांच्या ताब्यात देण्यात आला.
दि. 25/08/2021ते 29/08/2021दरम्यान अनिल कोचेटा हे राजस्थान येथील जोधपूर येथे देवदर्शनाला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यानी घराचा कडी कोंडा तोडून सोन्याची चैन, अंगठ्या, बांगड्या असा 16लाख 90हजार 578रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात गुरंन 306/2021,भादवी कलम- 454 ,457, 380, 120 (ब) अन्वये दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात पोलिसांनी सैय्यद हारून (वय 25), अनिल रमेश चौधरी( वय 40),सैय्यद आराफत फारुख (वय 32), सैय्यद अमीन उर्फ बुलेट सैय्यद फारुख (वय 21),भावना जवाहरलाल लोढा सर्व रा. जळगांव यांना अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
 गुन्ह्यात फिर्यादी नामे -अनिल रिखपदास कोटेचा, राहणार पहूर यांनी मा. सेशन कोर्ट जळगाव यांचेकडील क्रिमिनल रिविजन एप्लीकेशन क्रमांक- 77/2024 दिनांक-01/01/2025 अन्वयेचा गुन्ह्यातील गेला मुद्देमाल ताब्यात मिळणे कामीचा आदेश प्राप्त केल्याने आज रोजी योग्य ती कागदोपत्री पूर्तता करून सुपूर्तनाम्याद्वारे मुद्देमाल (सोन्याची- चैन, अंगठ्या, बांगड्या,वजन-348.87 ग्रॅम, किंमत रुपये-16,90,578 ) असा फिर्यादीचे ताब्यात पोलीस निरीक्षक सचिन सानप उप निरीक्षक भरत दाते यांनी दिला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads