ब्रेकिंग न्युज: विहिरीत काम करताना स्फोट – एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार..
जामनेर तालुक्यातील अंबील होळ डवरी येथे विहिरीचे काम सुरू असताना आज मोठा अपघात घडला. कामादरम्यान झालेल्या ब्लास्टिंगच्या स्फोटात राहुल वाघ (रा. मुंदखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर भूपेश चव्हाण (रा. अंबील होळ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी भूपेश चव्हाण यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांना धीर दिला तसेच जखमीच्या तातडीच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विहिरीच्या कामासाठी घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा