राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तरुण नेतृत्व आशिष दामोदर यांचा जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश - दैनिक शिवस्वराज्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तरुण नेतृत्व आशिष दामोदर यांचा जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं तरुण नेतृत्व आशिष दामोदर यांचा जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश त्यांनी केला .नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज बाबाजी राघो मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियान आढावा बैठकीचे आयोजन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष आशिष दामोदर यांनी त्यांच्या सहकाऱ्यां सोबत गिरीष महाजन यांचे नेतृत्व मान्य करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलेला होता.उत्कृष्ठ वक्तृत्व,संघटन कौशल्य असलेले आशिष दामोदर तरुण नेतृत्व म्हणून तालुक्यात परिचित आहे. सदर पक्ष प्रवेशामुळे जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निश्चितच आत्मचींतन करण्याची गरज असल्याची चर्चा ह्या निमित्ताने  होत आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads