संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन...
जामनेर, दि. 16 जानेवारी 2025
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य थेट बँक खात्यात (डी.बी.टी. पद्धतीने) जमा करण्यासाठी माहिती व कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डी.बी.टी. पोर्टलवर ऑनबोर्ड नसलेल्या व आधार सत्यापन न झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अनुदान दिले जाईल. मात्र, फेब्रुवारी 2025 पासून या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य थांबवण्यात येणार आहे.
यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, जन्मतारीख, जातीचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग टक्केवारी व वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कॅम्पचे आयोजन
जामनेर तालुक्यातील 13,000 लाभार्थ्यांपैकी 6,000 लाभार्थ्यांची माहिती अद्याप अप्राप्त असल्याने खालील गावांमध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे:
नेरी बु. - 16 जानेवारी
शेंदुर्णी - 17 जानेवारी
पहूर - 20 जानेवारी
फत्तेपूर - 21 जानेवारी
देऊळगांव - 22 जानेवारी
नाचणखेडा - 23 जानेवारी
पाळधी - 24 जानेवारी
तोडापूर - 27 जानेवारी
जामनेर - 28 जानेवारी
सूचना व सहभागी अधिकारी
कॅम्पच्या दिवशी संबंधित ग्राममहसूल अधिकारी, महसूल सेवक, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तसेच संजय गांधी योजना शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.
लाभार्थ्यांना आवाहन
लाभार्थ्यांनी आपापल्या गावांतील कॅम्प ठिकाणी वेळेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे तलाठी यांच्याकडे जमा करावीत. माहिती सादर न केल्यास फेब्रुवारी 2025 पासून अनुदान बंद होईल.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा