टाकळी खुर्द ग्रामपंचायत उपसरपंचपदी मीनाक्षी मोरे यांची बिनविरोध निवड
जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सौ. मीनाक्षी शरद मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत ग्रामसेवक गणेश घ्यार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.उपसरपंचपदासाठी सौ. मीनाक्षी शरद मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे, लोकनियुक्त सरपंच जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.या प्रसंगी सरपंच जितेंद्र माळी, माजी उपसरपंच विजय चवरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, अमोल महाजन, सौ. सुरेखा रमेश महाजन, नम्रता दीपक बावस्कर यांच्यासह परिवर्तन पॅनलचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुरुवर्य रमेश चवरे सर, सुनील जंजाळ सर, विनोद माळी, आनंद महाजन, अनदा सोन्ने, सीताराम नेरकर, युवराज मोरे आणि गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषात मीनाक्षी शरद मोरे यांचे स्वागत केले. उपसरपंचपदी विराजमान होताच त्यांनी ग्रामविकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.गावकऱ्यांच्या एकजुटीचा आणि सहकार्याचा हा उत्साहपूर्ण सोहळा गावाच्या विकासासाठी एक नवा अध्याय ठरणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा