वंचित बहुजन माथाडी युनियनच्या जिल्हा सरचिटणीसपदी विजयकुमार लोंढे यांची निवड.... - दैनिक शिवस्वराज्य

वंचित बहुजन माथाडी युनियनच्या जिल्हा सरचिटणीसपदी विजयकुमार लोंढे यांची निवड....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी विजयकुमार लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. युनियनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते यांनी नुकतीच सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.
    सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी प्रा. सुरज अरखराव, जिल्हा सरचिटणीस पदी प्रा. विजयकुमार लोंढे, जिल्हा संघटकपदी प्रा. सुधाकर
साबळे, कोषाध्यक्षपदी अविनाश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
     विजयकुमार लोंढे हे बहुजन आवाज न्यूज या चॅनलचे संपादक तसेच पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव पदी कार्यरत असून या माध्यमातून गोरगरीब, वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अहोरात्र करीत असल्याने त्यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads