रेल्वे अपघात: मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची भेट घेतली, उपचारांसाठी दिले महत्त्वाचे निर्देश
पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने परिसरात खळबळ उडवली आहे. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच काही खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देत जखमींची प्रकृती जाणून घेतली.मंत्री महाजन यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर उत्तम उपचार करण्यात कोणतीही कसर ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी खासदार स्मिता वाघ आणि डॉ. सागर गरुड यांनीही उपस्थिती दर्शवत जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत मंत्री महाजन यांनी सांगितले की, सरकार अपघातग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळतील यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.घटनास्थळी मदतकार्य सुरू असून प्रशासन, स्थानिक अधिकारी, मदत कार्य सुरू आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा