ग्रामपंचायत शेंगोळाच्या सरपंचांनी मागितली पोलिस सुरक्षा; उद्घाटन सोहळ्यावर वादळाची शक्यता
(ता. जामनेर) – शेंगोळा ग्रामपंचायतीच्या नव्या बांधकामाचा उद्घाटन सोहळा २४ जानेवारी २०२५ रोजी पार पडणार आहे. मात्र या सोहळ्यापूर्वी सरपंच सरला मोहन बेलेकर यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी फतेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. गणेश फड यांच्याकडे अर्ज केला आहे.
सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनाच्या ठिकाणी शिलालेख लावण्यासंदर्भात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या अर्जात उल्लेख केला आहे की, त्यांच्या विरोधात असलेल्या काही व्यक्तींकडून संभाव्य हल्ल्याचा धोका असल्यामुळे पोलिस संरक्षणाची नितांत आवश्यकता आहे.सरपंचांनी असे म्हटले आहे की, उद्घाटनाच्या तयारीसाठी आजच्या दिवशी कार्यक्रमस्थळी त्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. मात्र त्यांना स्थानिक व्यक्तींनी त्रास देण्याची शक्यता असल्याने त्यांनी तातडीने पोलिस संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली आहे.उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तरीही निर्माण झालेल्या या वादामुळे कार्यक्रमाच्या वेळी काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा