जामनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय बैरागी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन...
जामनेर पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी संजय बैरागी साहेब यांचे तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासनात शोककळा पसरली असून, त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंत्ययात्रेची वेळ व स्थळ
संजय बैरागी साहेब यांच्या पार्थिवावर आज, दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी रात्री 8:30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्ययात्रा त्यांचे राहते घर, गणराया विहार, हॉटेल सुहास समोरील कन्हाळा रोड, कुकरेजा मार्टसमोर, भुसावळ येथून निघणार आहे.त्यांच्या अकाली जाण्याने एक मेहनती व समर्पित अधिकारी हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा