शिवस्वराज्य न्यूजचा इफेक्ट: जामनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी काढले चौकशीचे पत्र...
जामनेर: शेंगोला ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या वादग्रस्त लोकार्पण प्रकरणात शिवस्वराज्य न्यूजने केलेल्या बातमीची तात्काळ दखल घेत, जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी चौकशीसाठी अधिकृत पत्र जारी केले आहे.ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे लोकार्पण माजी सरपंच दिलीप रडाळ यांनी परस्परपणे केल्याचा आणि विद्यमान महिला सरपंच सरला बेलेकर यांना डावलल्याचा आरोप करत हे प्रकरण गाजले होते. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रात संबंधित व्यक्तींवर चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महिला सरपंच सरला बेलेकर म्हणाल्या
शिवस्वराज्य न्यूजने ही बाब उचलून धरल्यानंतरच प्रशासनाला जाग आली. हा माझ्या पदाचा व महिलासन्मानाचा अपमान असून, यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे.गावकऱ्यांमध्येही या प्रकरणावर तीव्र नाराजी असून, प्रशासनाच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा