जामनेरात भाजपाच्या सदस्यता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
जामनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "विकसित भारत 2047" या संकल्पनेला गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्र प्रथम या तत्त्वावर चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत, भाजपा परिवाराचा भाग होण्यासाठी 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सहज सदस्य होता येत आहे.
आज सकाळपासून जामनेर नगर परिषदेसमोर भाजपा सदस्य नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, शहरातील अनेक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. भाजपा नेते जितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले की, अंत्योदयाच्या मार्गाने समृद्ध भारत घडवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी भाजपाचे सदस्य होण्याचे आवाहन करतो.
कार्यक्रमास भाजपा नेते रविंद्र झाल्टे, चंद्रकांत बाविस्कर, अतिष झाल्टे, नवल पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या वाढत्या सहभागामुळे अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात पक्षबांधणी अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा