मानमोडी येथे ग्रामस्थांचे उपोषण; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सकारात्मक आश्वासन...
बोदवड तालुक्यातील मौजे मानमोडी येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले होते. ग्रामस्थांच्या या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल आणि त्यांना विश्वासात घेऊनच योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले. ग्रामस्थांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री महाजन यांनी ग्रामस्थांना उपोषण थांबवण्याची विनंती करत त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा शब्द दिला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून त्वरित पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा