सरपंच परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी जितेंद्र माळी यांची निवड..
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या जामनेर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी टाकळी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र माळी तर महिला अध्यक्षपदी पाळधी येथील उपसरपंच सौ. नीता कमलाकर पाटील यांची निवड करण्यात आली.उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.जितेंद्र माळी यांनी सरपंच म्हणून आपल्या गावात उल्लेखनीय विकासकामे केली असून, त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जितेंद्र माळी यांनी गेल्या दोन वर्षांत टाकळी खुर्द गावात उल्लेखनीय विकास साधला आहे. सरपंचपदी निवड झाल्यापासून त्यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अपार मेहनत घेतली. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने तालुक्यातील ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. महिलांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या नीता पाटील यांची निवड महिला नेतृत्वाला बळकटी देणारी ठरणार आहे.कार्यक्रमाला जळगाव जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ, जिल्हा सचिव युवराज पाटील, जिल्हा समन्वयक श्रीकांत पाटील, तालुका समन्वयक बाळू चव्हाण यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा