महाराष्ट्र
टाकळी जि. प. प्रा. मराठी शाळा येथे सावित्रीमाईंना अनोख्या पद्धतीने अभिवादन… सेवानिवृत्त शिक्षिका मिनाक्षी क्षिरसागर (गिड्डे) यांचा कौतुकास्पद उपक्रम…
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नवीन टाकळी येथे पंधरा वर्षे सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका मीनाक्षी क्षिरसागर (गिड्डे) यांच्या संकल्पनेतून सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जि. प. प्रा. मराठी शाळा टाकळी नवा येथील पहिली ते सातवीच्या एकूण ८५ विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे ८५ हजार रुपयांचे, मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात आले.
क्षिरसागर मॅडम यांना सेवानिवृत्तीनंतर टाकळी जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते.
त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी टाकळीच्या विद्यार्थिनींसाठी प्रत्येकी १००० रुपयाची आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले होते त्याची पूर्तता म्हणून आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी श्रीमती मिनाक्षी क्षिरसागर आणि त्यांचे कुटुंबीय एकत्रित येत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे रोख रक्कम सर्व विद्यार्थिनींना देण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीमती मिनाक्षी क्षिरसागर (गिड्डे) यांनी जवळपास मी टाकळी येथे पंधरा वर्षे सेवा केलेली असून माझ्या सेवेमध्ये टाकळीकरांचा खूप मोठा वाटा असून टाकळीकरांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आणि विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी म्हणून मी हा निर्णय घेतला होता. तुम्ही आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्या, मुलींचे लग्ने लवकर लावू नका. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहू द्या. असे आवाहन जमलेल्या पालकांना केले.
या प्रसंगी बोलताना ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगत छत्रपती शाहू राजांनी बाबासाहेबांना विलायतीच्या शिक्षणासाठी मदत केली होती. ती मदत म्हणजे बाबासाहेबांना शिक्षणासाठीची प्रेरणा होती. तीच प्रेरणा आज टाकळीकर विद्यार्थिनींना क्षिरसागर मॅडम यांनी दिलेल्या मदतीतुन मिळणार आहे. आजच्या आधुनिक युगात आमच्या टाकळीकर विद्यार्थिनींसाठी क्षिरसागर मॅडम म्हणजे आधुनिक शाहू महाराज आहेत. असे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी क्षिरसागर मॅडम यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका हेमलता नाईकनवरे, नीलम महाजन, शीला बसरकोड, उपसरपंच सिद्धाराम घोडके, सदस्य चंद्रशेखर गायगवळी, विक्रमसिंह गिड्डे, विजयश्री गिड्डे, संजीवनी शितोळे, मृणाल शितोळे अंबादास पाटील, धानय्या हिरेमठ, संजय गौडगांवकर, चंद्रकांत दिवटे, नरसप्पा इटकर व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा