अखेर जामनेर शहरातील रोडवरील टपऱ्यांवर प्रशासनाचा बुलडोझर अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई
जामनेर शहरातील जळगाव रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून उभ्या असलेल्या टपऱ्यांवर अखेर आज प्रशासनाने बुलडोझर चालवत कारवाई केली. नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत हे अतिक्रमण हटवण्यात आले. मुख्याधिकारी नितीन बागुल आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई राबवण्यात आली.आज सकाळपासूनच नगरपरिषद आणि पोलिसांचे पथक जळगाव रोडवर दाखल झाले. आधीच नोटिसा बजावूनही अनेकांनी टपऱ्या हटवल्या नव्हत्या, त्यामुळे सकाळी बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईत नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिसांचा मोठा ताफा अधिकारी उपस्थित होते.या मोहिमेमुळे काही टपरीधारक नाराज झाले असून, त्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, त्यामुळे रस्ता मोकळा होईल आणि वाहतुकीला अडथळा कमी होईल, असे मत व्यक्त केले.नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, फक्त जळगाव रोडच नव्हे, तर शहरातील इतर मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू राहील. लवकरच वाकी रोड, भुसावळ रोड आणि पाचोरा रोडवरील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या आणि हातगाड्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कोणीही अनधिकृतपणे जागा अडवू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा