जामनेरात अतिक्रमण हटाव मोहीम; वाकी रोड, भुसावळ रोड आणि पाचोरा रोडवरील हातगाड्या व टपऱ्या हटवण्याची कारवाई सुरू...
जामनेर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आज सकाळपासून धडक मोहीम हाती घेतली आहे. वाकी रोड, भुसावळ रोड आणि पाचोरा रोड या प्रमुख ठिकाणी अतिक्रमण करून बसलेल्या हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत दुकाने हटवण्याची कारवाई सुरू असून, शहरात मोठ्या प्रमाणावर प्रशासनाची उपस्थिती पाहायला मिळत आहे.अतिक्रमण हटवण्याआधी दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद प्रशासनाने सर्व संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काहींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे.यावेळी अतिक्रमण धारकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी प्रशासनाचा कारवाईचा निर्धार कायम आहे. शहरातील रस्ते मोकळे व्हावेत, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना चालण्यासाठी सुलभ रस्ते मिळावेत, यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेस नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुढील काही दिवस ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा