जामनेर-गोद्री रोड येथून बैलजोडी चोरीची घटना... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर-गोद्री रोड येथून बैलजोडी चोरीची घटना...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील गोद्री रोडवरील दिलीप पंडीत चौधरी यांच्या वाड्यातून काल रात्री बैलजोडी चोरीला गेली आहे. ही घटना ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण करणारी ठरली आहे. चोरीस गेलेल्या बैलजोडीचे वर्णन असा आहे मजबूत शरीरयष्टी आणि पांढऱ्या रंगाचे.चोरी झाल्यानंतर चौधरी कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे आणि पोलीस तपास सुरू आहे.जर कोणाला ही बैलजोडी आढळल्यास किंवा त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास, कृपया त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा
9689679292 / 8975834095

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads