जामनेरात कांग नदी पुलावर भीषण अपघात: दुचाकीस्वार गंभीर जखमी
जामनेर-भुसावळ रस्त्यावरील कांग नदी पुलावर दुपारी 4 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात डंपरने दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जखमी दुचाकीस्वाराचे नाव शफीक खान(वय 28) असून तो अजिंठा येथील रहिवासी आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमीला मदत केली आणि त्याला तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.अपघातात डंपरच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जामनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि डंपर जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा