महाराष्ट्र
किल्ले प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण थाटात संपन्न...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : किल्ले प्रतिष्ठान शिवभक्त मावळ्यांची संघटना मागील 24 वर्षापासून समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षीदार असणारे गडकोट किल्ले यांच्या जतन संवर्धनासाठी, याविषयीचे प्रेम वाढीस लागावे याकरिता कार्यरत आहे.
यंदाच्या वर्षी संघटनेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून लवकरच पंचविसावा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार आहे .संघटनेचे संपर्क कार्यालय दुर्गालय भवन येथील श्री शिव शाहू सभागृह येथे किल्ले प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रौप्य महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच संघटनेचे निष्ठावंत मावळे विजय चेळेकर, संतोष पवार यांच्या हस्ते थाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत पाटील हे होते. तर उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीकांत गायकवाड, कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेडचे अतुल माने संदीप जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर प्रास्ताविका मधून बोलताना किल्ले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशांत वाघचवरे यांनी संघटनेच्या वतीने आजवर केलेल्या कार्याची उजळणी करत येणारा रौप्य महोत्सव , रौप्य महोत्सवी वर्ष थाटामाटात साजरे करण्यासाठी सर्वांनी तन-मन-धन अर्पण तयारीला लागावे असे आवाहन केले.
यानंतर प्रमुख पाहुणे श्रीकांत गायकवाड यांनी संघटनेच्या वाटचालीचे कौतुक करून सर्वसामान्य युवकांनी सुरू केलेली ही रौप्यमहोत्सवी वाटचाल भविष्यात देखील अशीच सुरू ठेवावी व याकरिता लागणारी आवश्यक ती मदत करणार असलेले सांगत संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असे सांगितले तर छत्रपती ब्रिगेडचे अतुल माने व संदीप जाधव यांनी किल्ले प्रतिष्ठान ही शिवा विचारांवर वाटचाल करणाऱ्या संघटनेने हा शिव विचारांचा वारसा आणि वसा नेटाने पुढे चालू ठेवावा असे सांगितले.
यानंतर अध्यक्षीय मनोगतातून प्रशांत पाटील यांनी आपण संघटनेच्या स्थापनेपासून सोबत असून संघटनेने गडकोट किल्ल्यांचा इतिहासा बद्दल जनमानसात जागृती प्रेम वाढीस लागावे यासाठी किल्ले पर्यटन सहलींचे आयोजन करत अर्थाजनाची नवीन वाट चोखाळत लोकसहभागातून गडकोट किल्ले जतन संवर्धनाचे कार्य अधिक जोमाने करता येईल असे मत व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष दिनेश जाधव, उपाध्यक्ष अनिल मस्के, राहुल मांजरे, सुजय वाघचवरे, प्रतिक पाटील, विशाल जगताप, राजू सुरवसे, राजेंद्र पाटील जयवंत हैदळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज चव्हाण, वेदांत खुळे, वैभव गायकवाड, रोहित गुमटे, हर्षल शिंदे, सुनील खुळे, प्रशांत गुंड, लक्ष्मण नाझरकर यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन विजय चेळेकर यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा