महाराष्ट्र

वडापूरच्या उपसरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर ; तहसीलदारांच्या उपस्थितीत झाली विशेष सभा....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर ( मंद्रूप) : वडापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सविता वाघचवरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविविश्वास ठराव दोन विरुद्ध सहा मतांनी मंजूर झाल्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले. यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंचासह आता उपसरपंच पदही रिक्त झाले आहे.
उपसरपंच वाघचवरे यांच्या विरोधात सहा सदस्यांनी २१ जानेवारी रोजी तहसीलदार जमदाडे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरवाबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी (ता.२७) रोजी दुपारी एक वाजता ग्रामपंचायतीच्या सदस्यांची विशेष सभा तहसीलदार जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला अविश्वास ठराव दाखल केलेले सदस्य संजय पारसे, सुभाष शिंदे, प्रदीप पुजारी, सुजाता पाटील, शबाना तांबोळी व कल्पना हेगडे तसेच उपसरपंच सविता वाघचवरे व बायका कांबळे उपस्थित होत्या. या सभेत ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ नुसार तहसीलदार जमदाडे यांनी अविश्वास ठरावाची पडताळणी केली. यावेळी उपसरपंच वाघचवरे यांनी अविश्वास ठरावाबाबत गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली. नुसार मतदान घेण्यात आले. तेव्हा अविश्वास ठरावाच्या बाजूने सहा सदस्यांनी मतदान केले. तर दोघांनी विरोधात मतदान केले. यामुळे हा ठराव दोन विरुद्ध सहा मतांनी मंजूर झाल्याचे तहसीलदार जमदाडे यांनी जाहीर केले. या सभेसाठी ग्रामसेवक प्रवीण घाडगे यांनी सचिव म्हणून काम पाहिले.
🔴सरपंच पद रद्द तर उपसरपंचाचे झाले रिक्त ...
गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव होते. या प्रवर्गातून निवडून आलेल्या तत्कालीन सरपंच राजश्री कोळी यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले. त्यामुळे वर्षभरापूर्वी सरपंचपद रद्द झाले होते. तेव्हापासून उपसरपंच वाघचवरे या ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळत होत्या. आज मंजूर झालेल्या अविश्वास ठरावामुळे त्यांचे उपसरपंच पदही गेले. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सध्या तरी सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा