महाराष्ट्र
माता रमाई याची 127 वी जयंती वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना व संकल्प क्रिडा आणि पवित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर जिल्हा यांच्यावतीने पेढे वाटुन साजरी...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून माता रमाई भिमराव आंबेडकर होटगी रोड येथील चौकामध्ये लावण्यात आलेल्या फलकास' पवित्रा महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने आणि वंचित बहुजन माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार यूनियन सोलापूर यांच्या संयुक्त विध्यमाने जिल्हाध्यक्ष प्रा. सुरख अरखराव व युवा उदयोजक अविनाश माने यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले सो.म.पा. कर विभागातील माजी कर-निरीक्षक श्री. सगरी साहेब यांनी माता रमाई यांच्या जीवन प्रवासा विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तसेच 'वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा सरचिटणीस विजयकुमार लोंढे सर व पवित्रा महिला बहुउद्देशिय संस्थेचे सचिव मा. अविनाश वाघमारे आणि संस्थेचे
पद्माधिकारी उपस्थित होते. तसेच अन्नपूर्णा स्विट होमचे म्यानेजर नितीन वाघमारे, वैभव रणदिवे, अभिषेक भालेराव व होटगी रोड रिक्षा संघटनेचे चालक व शेख चाचा आदि. मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा