सोलापूर शहर व गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी ; ओळखीच्या ठिकाणी चोरी करणारा गुन्हेगार अटकेत , ४,९२,५२० /- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत... - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर शहर व गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी ; ओळखीच्या ठिकाणी चोरी करणारा गुन्हेगार अटकेत , ४,९२,५२० /- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत...


समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : तक्रारदार श्रीकांत बाबू गोलेकर वय ३७ वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. ब्लॉक नं. १४ सोनी नगर, मोदी हुडको, सोलापूर यांचा चुलत भाऊ अनिल शंकर गोलेकर यांचे घरी दि. २२ जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रम असल्याने तक्रारदार व इतर नातेवाईक, अनिल गोलेकर यांचे राहते घर, ब्लॉक नं. १२९ सोनी नगर मोदी हुडको, सोलापूर या घरी ये जा करीत होते. सदर कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांचे घरातून अनिल यांचे घरात ये-जा करीत होते. त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्याचे घरास कूलूप न लावता घर उघडेच ठेवले होते. सदर कार्यक्रमा दरम्यान दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्रौ १०:३० वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने श्रीकांत यांचे राहते घरात प्रवेश करुन बेडखाली ठेवलेली पत्र्याची पेटी व त्यामध्ये ठेवलेले सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ८७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
   वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनिल दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली होती. सदर गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पध्दतीवरुन सपोनि शैलेश खेडकर यांना तक्रारदार यांचे जवळच्याच कोणीतरी माहितगार व्यक्तीने गुन्हा केला असल्याबाबत दाट संशय होता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत कठिण झाले होते. परंतु सपोनि शैलेश खेडकर व पथकाने गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविली. तसेच त्या अनुषंगाने तांत्रीक माहितीचे अत्यंत कौशल्याने काळजीपूर्वक विश्लेषण केले. या सर्व माहिती वरुन गुन्हा करणारा इसम हा फिर्यादी श्रीकांत गोलेकर याचा जवळचा नातलग अनिल गोलेकर वय ३३ वर्षे, धंदा मजुरी रा. ब्लॉक नं. १२९, सोनी नगर, मोदी हुडको सोलापूर हा असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यास सपोनि शैलेश खेडकर व पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुददेमालासह दि. ०७ फेब्रुवारी रोजी मोदी स्मशानभुमी जवळून ताब्यात घेतले. त्याचे अंगझडतीत, त्याने फिर्यादी यांचे घरातून चोरलेले ८५.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व १८४.५ वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण ४,९२,५२० /- रु. किंमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा अत्यंत काळजीपुर्वक कौशल्याने उघडकीस आणला.
    सदरची कामगिरी एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ. दिपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहा. पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनिल दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads