जामनेरात हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक कुस्ती दंगल – ‘नमो कुस्ती महाकुंभ 2’ चे भव्य आयोजन - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक कुस्ती दंगल – ‘नमो कुस्ती महाकुंभ 2’ चे भव्य आयोजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर नगरीत कुस्ती प्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण उलगडणार आहे. ‘नमो कुस्ती महाकुंभ  2 व ‘देवाभाऊ केसरी’ या भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आज रोजी हिवरखेडा रोडवरील गोविंद महाराज संस्थान पटांगणावर भव्य स्वरूपात पार पडणार आहे.या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
या भव्य कुस्ती महादंगलसाठी फ्रान्स, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया यांसह भारतातील नामांकित पैलवान जामनेरमध्ये हजेरी लावणार आहेत. या स्पर्धेत हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी विजेते पैलवान आखाड्यात उतरून शक्तीचा जोर आजमावणार आहेत. तसेच ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान या ऐतिहासिक कुस्ती लढतीत भाग घेणार आहेत.
या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुका आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने स्वागतासाठी सिद्ध झाले आहेत.
कुस्तीप्रेमींनी या थरारक लढतीचा प्रत्यक्ष आनंद घ्यावा आणि कुस्ती महाकुंभाचे साक्षीदार व्हावे


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads