आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि. 16 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 16 फेब्रुवारी 2025 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रम पुढील प्रमाणे मुख्यमंत्र्यांचे आगमन दुपारी 3:45 वाजता जळगाव विमानतळावर होणार असून त्यानंतर ते शेंदुर्णी, ता. जामनेर येथे जातील. तिथे दुपारी 4:30 वाजता "दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि." संस्थेच्या अमृत ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील. मुख्यमंत्री संध्याकाळी 5:30 वाजता श्री. गोविंद महाराज क्रीडांगण, हिवरखेडा रोड, जामनेर येथे आगमन, सायंकाळी 6:00 वाजता जामनेर येथे "नम्मो कुस्ती महाकुंभ - 2" या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.संध्याकाळी 7.15 वाजता जामनेर वरून जळगाव विमानतळाकडे प्रयाण , 7.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन , रात्री 7:50 वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा