कुस्तीच्या आखाडय़ात मंत्री गिरीष महाजन यांनी केले विरोधकांना चित. मी सुद्धा पैलवान
जामनेरच्या धर्तीवर हलकगीचा साद आणि लालमातीच्या सुगंधात "देवाभाऊ केसरी" व नमो कुस्ती महाकुंभाच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशात कुठेही न झालेल्या हिंदुस्थानातील कुस्तीचा सामना शहरातील हिवरखेडा रोडवरील भव्य पटांगणावर दि. १६ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तींची भव्य दंगलीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदामंत्री मंत्री गिरीश महाजन जामनेर नगरीच्या शिल्पकार साधना महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आ. राजु मामा भोळे, आ. अमोल जावळे, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रामेश्वर रेड्डी, सचिव जितेंद्र पाटील दुध संघाचे चेअरमन अरविंद देशमुख तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते . आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या महाकुंभात विदेशासह देशातील नामांकित मल्लांनी आपल्या कुस्तींचे मोठे प्रदर्शन करुन विरोधी पहिलवानास चित करीत हरविले तशाच उत्तर देत त्याच कुस्तीच्या आखाडय़ात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी विरोधकांचा भरपूर समाचार घेत त्यांना चित केले. विरोधकांनी वेळोवेळी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या परंतु राज्यातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पसंती दिली व महायुतीला बहुमताने निवडून दिले याचे पोटसुळ उठून विरोधकांना पोटात दुखले देशाचे प्रतिभाशिल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली आपला देश जगात प्रभावी छाप सोडत आहे. हेच विरोधकांना पचत नसल्याने काहीही अफवा पसरवुन विकासाला खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच लाडकी बहिण योजना बंद होणार नसुन ज्यांचे उत्पन्न दोन पट, तीन पट असतील किंवा जे निकषात बसत नसतील त्यांना वगळण्यात येईल परंतु जे निकषात बसतील त्यांनाच त्याचा लाभ मिळेल. दिल्लीकरांनी सुद्धा भाजपाला पसंती दिली व बहुमताने निवडून दिले असा खरपूस समाचार मंत्री गिरीश महाजन घेतला. त्याचप्रमाणे युवकांनी "नाद कुस्तीचा" व "प्रण व्यसनमुक्तीचा" हा मंत्र देशातील पिढी पर्यंत पोहचविण्यासाठीच मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले होते. सदर आयोजित केलेल्या कुस्ती दंगलीत हिंदुस्थानातील तसेच फ्रान्स, माल्दोवा, उझबेकिस्थान, रोमानिया, आणि एस्टोनिया या देशातील जागतिक पातळीवर वरील विजेते ऑलिंपियन, हिंद केसरी, रूस्तुम- ऐ - हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी, यांसारख्या मल्लांसह प्रसिद्ध महिला कुस्तीगीर सहभागी झाले त्यांचा रोमहर्षक सामना पाहण्यासाठी होते आपल्या कुस्तीची कमाल दाखवली. " नमो कुस्ती महाकुंभ" व "देवाभाऊ केसरी" कुस्त्यांचा महासंग्राम बघण्यासाठी खान्देशातील हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी कुस्त्यांचा थरार याची देही याची डोळा अनुभवला व ते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतहजारो मोबाईलच्या कॅमेर्यात कैद केले. त्यावेळी भारतातील रथी महारथींच्या कुस्त्यांचा सामना रंगला. सामना बघता यावा यासाठी भव्य स्टेडियम उभारण्यात आले होते जणु करुन प्रत्येक प्रेक्षकाला बसुन कुस्त्यांचा आनंद घेता येईल. तसेच जागोजागी वाहनतळ उभारण्यात आले होते. कुस्त्यांच्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा