जामनेरात बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या मंगळसुत्रांवर डल्ला.. जामनेर बस स्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या मंगळसुत्रांवर डल्ला.. जामनेर बस स्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर,दि.17 जामनेरहून भुसावळ ला जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असून जामनेर बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने नियमित पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानकात पुणे~भुसावळ बस क्र.MH.20,BL.4020 उभी होती आणि या ठिकाणी जामनेर हून कुऱ्हा(पानाचे) येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या जयश्री पाटील व प्रतिभा तायडे या दोन महिला बस मध्ये गर्दीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांनी बस मधील प्रवाशांची ड्रायव्हर , कंडक्टर यांना झडती घ्यायला सांगितले.परंतु काहीही मिळून आले नाही.या दोन्ही महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला.दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.राज्य सरकारने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने दिवसा गणिक एस.टी.ने प्रवास करणाऱ्यात महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.राज्यातील प्रत्येक बस स्थानका वर बसने प्रवास करणाऱ्या पुरुषां पेक्षा महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.सध्या लग्न सराई चे दिवस असून प्रत्येक बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे,या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.जामनेर बस स्थानकावर देखील प्रवाश्यांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसां पासून या बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दर दिवसाआड येथे चोरीच्या घटना घडत आहेत.कुणाचा खिसा कापला जातो,तर कुणाची बॅग लंपास तर कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन,कानातील दागिन्यांवर चोरटे बिनधास्त डल्ला मारत असतात.सध्या बाजारपेठेत सोन्याचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असून सर्वसामान्यांना आजघडीला सोने खरेदी करणे अवक्या बाहेरची बाब असतांना चोरट्यांची मात्र या चोरी सत्रामुळे चांगलीच चांदी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.काही वर्षांपूर्वी जुने बस स्थानक असताना या बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत होती.मात्र नवीन बस स्थानक झाल्या नंतर या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी देखील कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने या बस स्थानकावर नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads