जामनेर वनविभाग कार्यालयात पाणीटंचाई महिला कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय, प्रशासनाचे दुर्लक्ष
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर: होळ हवेली रोडवरील वनविभाग कार्यालयात पाणीटंचाईमुळे अधिकारी, कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कार्यालयात शौचालय आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने विशेषत महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे कार्यालयात पाणी उपलब्ध नसल्याने महिला कर्मचाऱ्यांना शौचालयासाठी बाहेर जावे लागते. ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. महिला कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सरकारी कार्यालयात पिण्यासाठी आणि शौचालयासाठी पाणी उपलब्ध नसल्याने येणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. काही वेळ थांबावे लागल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून कर्मचारी आणि नागरिकांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कार्यालयातील कर्मचारी अनेक दिवसांपासून या समस्येने त्रस्त आहेत.सरकारी कार्यालयातच पिण्याच्या आणि शौचालयाच्या पाण्याचा अभाव असल्यामुळे नागरिक आणि कर्मचारी यांच्यात नाराजी वाढत आहे.सार्वजनिक सुविधा असलेल्या ठिकाणीही पाण्यासारख्या मूलभूत गरजेची गैरसोय होत असेल, तर सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल? प्रशासनाने त्वरित पाणीपुरवठ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा