चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या कामांचा आढावा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांशी संबंधित कॅनॉल दुरुस्ती आणि गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीला माजी आमदार शोभाताई फडणवीस, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजय टाटू, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, अधीक्षक अभियंता राजेश पाटील व प्रवीण झाडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर चर्चा झाली. मंत्री महाजन यांनी कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा