शिवजयंती निमित्त विजयानंद हॉस्पिटल आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद... - दैनिक शिवस्वराज्य

शिवजयंती निमित्त विजयानंद हॉस्पिटल आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर उत्साहात साजरी करण्यात येते. या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत विजयानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. नंदलाल पाटील यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तसेच, श्री संत सेवालाल महाराज, स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज आणि संत रविदास महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हे शिबिर आयोजित करण्यात आले. हे महारक्तदान शिबिर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत विजयानंद हॉस्पिटल येथे पार पडले.या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ८२ महिला व पुरुष रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजसेवेत मोलाचे योगदान दिले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आणि रक्तदानाच्या जनजागृतीसाठी विविध मान्यवरांनी सहकार्य केले.यावेळी डॉ. नंदलाल पाटील यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतील, असा विश्वास व्यक्त केला.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आणि त्याच्या नियोजनासाठी डॉ. विजया पाटील, डॉ. नंदलाल पाटील, प्रल्हाद बोऱ्हाडे, प्रफुल्ल पाटील, महेश राणे, नितीन झोपे, अभिनंदन जैन, मनोज माळी, स्वप्नील पाटील, अंगद पाटील, वैभव माळी, डॉ. मंदार पाटील, डॉ. शुभम साळवे, डॉ. साक्षी पाटील, डॉ. जोशना पाटील, नवलसिंग गुरुजी, अनंतराव पाटील, भगवान ओंकार पाटील, संजय पाटील, डॉ. गजानन पाटील, कैलास पाटील, अरुण पाटील, अनिरुद्ध पाटील, संदीप पाटील, डॉ. मनोज पाटील (खादगाव), नितीन भोई, संतोष नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शिवजयंतीचा सामाजिक उपक्रम म्हणून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यामुळे समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहे, असे उपस्थितांनी सांगितले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads