छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाचनखेडा येथे रक्तदान शिबिर - दैनिक शिवस्वराज्य

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नाचनखेडा येथे रक्तदान शिबिर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे ना

नाचनखेडा (ता. जामनेर) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व सहकारी मित्र पुण्यस्मरणार्थ श्रीराम ग्रुप नाचनखेडा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संगमेश्वर महादेव मंदिर (मठ) येथे भरविण्यात आलेल्या या शिबिरात गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील मान्यवर उपस्थित होते. पहूर पोलीस स्टेशनचे PSI दाते साहेब, पोलीस कर्मचारी व स्टाफ यांनी विशेष सहकार्य केले. तसेच पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर भाऊ पाटील, ह.भ.प मंगेश महाराज, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामसेवक अजय भाऊ साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ता किरण पाटील यांनी सुध्धा रक्तदान केले.

रक्तपेढी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सांगत सहभागी दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. आयोजक श्रीराम ग्रुप नाचनखेडा यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण केली.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads