महाराष्ट्र
विंचूर जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश ; समर्थ भीमाशंकर सोनगी याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दि. ८ फेब्रुवारी रोजी नेहरूनगर सोलापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बाल मैदानी स्पर्धेत जि.प.शाळा विंचूरचा खेळाडू समर्थ भीमाशंकर सोनगी याने जिल्ह्यातील वेगवान धावपटूचा मान मिळवत दुहेरी विजेतेपद पटकावले. 50 मीटर व 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत त्याने हे यश संपादन करत खो खो खेळाबरोबरच मैदानी स्पर्धेतही शाळेचा दबदबा कायम ठेवला. त्याची पंढरपूर येथे दिनांक 23 व 24 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवणारा तो विंचुरचा पहिला खेळाडू ठरला आहे.
समर्थ भीमाशंकर सोनगी यांना क्रीडा मार्गदर्शक व सोलापूर जिल्हा खोखो असोसिएशनचे सदस्य तुळशीराम शेतसंदी, शांतप्पा कोळी व अशोक साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरु बाळा सनके, केंद्रप्रमुख महादेव पेशवे, मुख्याध्यापक बसवराज बनपुरे, सरपंच बाळासाहेब पाटील, उपसरपंच पद्मावती भीमाशंकर फुलारी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज बिराजदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा