बिबट्याचा पहुर शिवारात धुमाकूळ कुत्र्यावर हल्ला, शेतकरी भयभीत
पहूर, २ फेब्रुवारी – पहूर शिवारातील एका शेतात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पहूर कसबे येथील शेतकरी पंडित शहादू घोंगडे यांच्या शेतात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. सकाळी शेतात आलेल्या शेतकऱ्यांना कुत्र्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी घटनास्थळी बिबट्याचे ठसेही स्पष्टपणे दिसून आले.या घटनेनंतर पहूर आणि एकूलती शिवारातील शेतकरी भयभीत झाले असून, रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. जामनेर वनविभागाचे अधिकारी प्रशांत पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना सांगितले की,
रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये.
लहान मुलांना शेतशिवारात एकटे सोडू नये.
शेताच्या आजूबाजूला प्रकाशाची सोय करावी
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने शिवारात गस्त वाढवली असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा