जामनेरमध्ये ‘संघटन पर्व’ अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद – भाजपाची सदस्य नोंदणीचा विक्रम..
जामनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षातर्फे ‘संघटन पर्व’ अभियान मोठ्या उत्साहात राबवले जात आहे. या अभियानांतर्गत जामनेर विधानसभा मतदारसंघात दिलेले ६८,४०० सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरातील जनतेसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.या मोहिमेअंतर्गत भाजपाच्या विचारधारेवर असलेला विश्वास, संघटनेच्या माध्यमातून राबवलेली विविध लोकहिताची कामे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकासयोजनांचा प्रभाव यातून नागरिकांनी मोठ्या संख्येने भाजपाच्या सदस्यत्वासाठी पुढाकार घेतला. जनतेचा वाढता विश्वास आणि भाजपाच्या संघटन कौशल्यामुळेच हे यश शक्य झाले, असे मत मंत्री महाजन यांनी व्यक्त केले.
जामनेर मतदारसंघात भाजपा सदस्य नोंदणी मोहिमेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचा आणि गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेरमध्ये झालेल्या विकासकामांचा स्पष्ट पुरावा आहे. भविष्यातही अधिकाधिक लोकांपर्यंत भाजपाचे विचार पोहोचवून संघटन बळकट करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा