मंत्री गिरीश महाजन यांचा खेळाडूंना शुभेच्छांचा चौकार जळगावमध्ये पोलीस क्रिकेट स्पर्धा
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस परेड ग्राउंडवर भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. त्यांनी देखील खेळाडूंना मार्गदर्शन करत, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.ही क्रिकेट स्पर्धा पोलिसांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि संघभावना वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत विविध पोलीस संघ सहभागी झाले असून प्रत्येक सामना चुरशीचा होणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा