सेवानिवृत्त शिक्षक व्ही. पी. पाटील सरांचे समाजकार्य –कोदोली गावासाठी निस्वार्थ सेवा
जामनेर तालुक्यातील कोदोली गावातील सेवानिवृत्त शिक्षक व्ही. पी. पाटील सर हे आपल्या पेन्शनमधील अर्धी रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करत आहेत. गावाच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांनी गावातील स्मशानभूमीत झाडांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या खर्चातून तारांचे कुंपण उभारले आहे, जेणेकरून माकडांमुळे झाडांचे नुकसान होऊ नये. झाडे टिकावीत म्हणून त्यांनी विशेष लक्ष दिले असून, "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत वृक्षसंवर्धनाची जागरूकता निर्माण केली आहे.गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतःच्या खर्चाने शाळेच्या प्रवेशद्वाराला रंग दिला आणि परिसर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी झाडांची लागवड के
याशिवाय, गावातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ राहावीत म्हणून ते दर महिन्याला स्वतःच्या खर्चातून सफाई कामगार लावतात. गाव स्वच्छ व आरोग्यदायी राहण्यासाठी ते नागरिकांनाही जागरूक करत असतात.
शिवस्वराज्य न्यूजचे प्रतिनिधी नितीन इंगळे आणि खानदेश सामना चे संपादक देविदास विसपुते हे कोदोली गावात गेले असता, तेथील नागरिकांनी पाटील सरांच्या समाजकार्यासंबंधी माहिती दिली. सरांकडूनही त्यांच्या कार्याची प्रेरणादायी कारणे जाणून घेतली.
त्यांच्या निस्वार्थ सेवेचे गावभर आणि तालुकाभर कौतुक केले जात आहे. त्यांच्या या समाजसेवेच्या कार्यामुळे गाव अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित होत आहे. गावविकासासाठी समर्पित अशा समाजसेवकांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे ग्रामस्थांचे मत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा