कर्तृत्वाचा गौरव.. जामनेरचे रहीम शेख यांना लोकमत शिलेदार पुरस्काराने सन्मानित
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
शिक्षण व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या जामनेरच्या रहीम शेख यांना लोकमत शिलेदार सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
सविस्तर वृत्त कर्तृत्व आणि समाजसेवेचा उज्ज्वल आदर्श उभारणाऱ्या जामनेरच्या रहीम शेख यांना प्रतिष्ठित ‘लोकमत शिलेदार सन्मान’ प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.हा भव्य सन्मान सोहळा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, एमआयडीसी जळगाव येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तसेच खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, उद्योजक श्रीराम पाटील आणि ज्येष्ठ संजय राणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आणि कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते जिकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम शेख आणि सचिव जाकीर शेख यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.रहीम शेख यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अथक प्रयत्नांमुळे जामनेरमध्ये शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाली आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.लोकमतच्या या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील कर्तबगार व्यक्तींना नवा सन्मान मिळत आहे. रहीम शेख यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा पुरस्कार जामनेरसाठी अभिमानास्पद ठरला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा