वाघूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला वेग – शेतकऱ्यांना दिलासा - दैनिक शिवस्वराज्य

वाघूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला वेग – शेतकऱ्यांना दिलासा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव जिल्ह्यातील वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांची माहिती व शंका दूर करत आहे.याच अनुषंगाने आज अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, तहसीलदार नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामनेर तालुक्यातील गावे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्थिर सिंचन सुविधा मिळून शेती अधिक फायदेशीर होणार आहे.
योजनेंतर्गत जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे नियमित आढावा घेत असून, प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील देखील प्रकल्पावर लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळेत सुविधा मिळावी यासाठी मार्गदर्शन करत आहेत.या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतीला मोठा फायदा होणार आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads