मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंसाठी मदतीचे आवाहन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
शासकीय योजनांच्या वैद्यकीय मदतीच्या निकषात बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या पाच रुग्णांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पाच लाखांची मदत मिळाली. वेळीच मिळालेल्या या सहकार्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
या रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात मदतीसाठी विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायकता कक्षास तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी त्वरित पुढाकार घेत आरव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून दिली.
दरम्यान, गरजू रुग्णांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योजक आणि खाजगी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा