नेरीजवळ अपघात.. 55 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
जामनेर तालुक्यातील नेरी गावाजवळ आज रात्री एका अनोळखी व्यक्तीचा अपघात झाला. अंदाजे 55 वर्षीय हा पुरुष गंभीर जखमी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा अपघातानंतर मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे आरोग्य दूत जालमभाऊ राजपूत, तुकाराम अप्पा निकम, कमलाकरभाऊ पाटील, सुभाष वाघोडे व अन्य कार्यकर्त्यांनी तत्काळ मदत करत त्याला उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. पुढील तपास सुरू आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा