महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोष्ट करणाऱ्या अश्फाक पटेल याचे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल अर्वाच शब्दात टीका करणाऱ्या अश्फाक पटेल याचे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा -मागणी करण्यात आली आहे.
औरंगजेब याचे उदात्तीकरण करुन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे बद्दल एकेरी भाषा वापरुन अर्वाच्च शब्दात टिका करणाऱ्या राष्ट्रद्रोही अश्फाक पटेल याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावे असे मागणे जामनेर शहरातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे
काँग्रेस पक्षाचा मानवाधिकार सेल चा जिल्हाध्यक्ष अश्फाक पटेल रा. जामनेर याने दि. ५ मार्च २०२५ रोजी त्याच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंट ला हिंदुस्थानचा शत्रु क्रूरकर्मा औरंगजेब वाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतुने पोस्ट व्हायरल केली. त्या अनुशंगाने नेटकऱ्यांनी त्याचेवर टिका केली .त्या टिकेला उत्तर देतांना अश्फाक पटेल याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करुन त्यांच्या बद्यल अपमानकारक अर्वाच्च भाषा वापरली तसेच औरंगजेब अमर रहे अशा स्वरुपाची कमेंट केलेली आहे.तसेच अश्फाक पटेल याने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्यावर अशा पध्दतीने टिका केल्यामुळे व औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यामुळे सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अश्फाक पटेल याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन तसेच महामानवांच्या बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी संत तुकाराम बहुद्देशीय मराठा सेवा संस्था तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने जामनेर तालुक्याच्य वतीने करण्यात आली.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा