मालदाभाडी हायस्कूलमध्ये बहिणाबाईंच्या कवितांचा सन्मानपूर्वक जागर.... - दैनिक शिवस्वराज्य

मालदाभाडी हायस्कूलमध्ये बहिणाबाईंच्या कवितांचा सन्मानपूर्वक जागर....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
मालदाभाडी (ता. जामनेर) – मराठी दिनाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी येथे 'खान्देश कन्या' बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर घडवण्यात आला. या विशेष कार्यक्रमात इयत्ता सातवीच्या १७ विद्यार्थ्यांनी अस्सल खान्देशी लहेजात बहिणाबाईंच्या कविता सादर करत रसिकांचे मन जिंकले.कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि तिचा महिमा उलगडून दाखवला. संदेश खुरपडे, रोशनी काळे, प्रतीक्षा खराटे यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणीव करून दिली. विशेष म्हणजे, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कवितांना अधिकच भावस्पर्शी स्वरूप दिले, यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. आर. शिकोकारे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ए. बी. पाटील, एन. जी. पाटील, आर. एल. कोळी आणि व्ही. आर. सैतवाल उपस्थित होते. जागृती बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक ऋतुजा पाटील हिने सादर केले. कार्यक्रमाची सांगता दिव्या मंगळकर हिने आभार प्रदर्शन करून केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विजय सैतवाल आणि एस. आर. शिकोकारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नववीच्या विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम उत्तम प्रकारे आयोजित करून एक आदर्श उभा केला, याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.कार्यक्रमाच्या यशामध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा मोठा वाटा होता. मनोज जैन, राजेश मोरे, तुषार उंबरकर, कार्तिक बडगुजर, गौरव बोरसे, प्रतिक गायके, सार्थक पोकऴे, राज पालवे, अमर पारधी, सागर पालोदे, सागर पाटील, कुणाल कोळी, मोहिनी बहुरुपे, शिवानी चोपडे, लीना बडगुजर, कोमल बाविस्कर, गायत्री कुटे, रोशनी पारपोळ, भाग्यश्री थाटे आणि प्राजक्ता पाटील यांनी मेहनत घेतली.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम जागृत करणारा ठरला असून, बहिणाबाईंच्या विचारांना नव्या पिढीत रुजवण्याचे कार्य शाळेच्या वतीने प्रभावीपणे घडवले गेले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads