जामनेरात मोठी दुर्घटना.. जुनी प.स. इमारत पाडत असताना कोसळली. मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश ...
जामनेर येथील वाकी रोडवरील सुमारे शंभर वर्षांपूर्वीची जुनी पंचायत समिती इमारत पाडण्याचे काम सुरू असताना चार वाजेच्या सुमारास इमारत कोसळून दोन मजूर मलब्याखाली दबून मोठी दुर्घटना घडली. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेने या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले या दोघेही मजुरांना तीन तासाच्या परिश्रमाने सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. इमारत पाडण्याचे काम करीत असलेला ठेकेदार सिद्धार्थ (राहणार जळगाव) व पोकलेन चालक हे दोघेजण इमारत कोसळताच घटनास्थळावरून पसार झाल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर पंचायत समितीची बाकी रोडवरील जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याचा प्रस्ताव मंजूर असून डीपीतून 3 कोटी 80 लाख या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी शासनाने मंजूर केले आहे .यासाठी गेल्या आठ दिवसापासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. आज चार वाजेच्या सुमारास या इमारतीच्या दरवाजे खिडक्या पाडण्यासाठी गोपीचंद तवर , भोजू तवर ,प्रतीक तवर सर्व राहणार डोहरी तांडा व जगदीश राठोड नागणचौकी असे सहा मजूर
काम करीत असताना दुसरीकडे वरच्या मजल्यावर पोकलेन च्या साह्याने इमारत पाडण्याचे काम सुरू असताना इमारत छता सह कोसळली. मात्र मध्ये काम करणारे सहा पैकी चार मजूर बाहेर पळाले दोन मजूर मलब्याखाली अडकल्याने गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, यांच्यासह सर्व पोलीस स्टॉप सर्व नगरपालिका कर्मचारी, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर ,उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर ,गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावून मदत कार्य सुरू झाले. नगरपालिकेने जेसीपीच्या सहाय्याने ढिगारा उपसण्याची सुरुवात केली. मलब्याखाली दबलेल्या दोघांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र दोघेही मजूर गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांना उपचारासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा