सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श: उपसरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशनमध्ये अन्नदान - दैनिक शिवस्वराज्य

सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श: उपसरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशनमध्ये अन्नदान

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
बोदवड – समाजातील मानसिक व बौद्धिक अपंगत्व असलेल्या, बेसहारा आणि मनोरुग्ण व्यक्तींना आधार देणारे आत्मसन्मान फाउंडेशन सतत सेवाभावी कार्य करत आहे. याच सेवाभावाला पुढे नेत, शेळगाव येथील उपसरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून अन्नदानाचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
 21 मार्च रोजी आत्मसन्मान फाउंडेशनमध्ये अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुका नेते दिलीप खोडपे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्हीजीएनटी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे, वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी. जी. माळी सर, चरणसिंग पाटील, रवी माळी, आकाश बावस्कर, तसेच संपूर्ण आत्मसन्मान टीम उपस्थित होती.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी सेवा आणि सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित करत, वाढदिवसाचा हा आगळावेगळा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यामुळे निळकंठ पाटील यांच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक होत आहे.समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम नक्कीच अनुकरणीय आहे. अशा कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो," असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.सामाजिक बांधिलकीचा हा आगळावेगळा उपक्रम निश्चितच इतरांसाठी दिशादर्शक ठरेल, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads