वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसमृद्धीचे नवे पर् - दैनिक शिवस्वराज्य

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसमृद्धीचे नवे पर्

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
हिवरखेडे बु., ता. जामनेर येथे 3 रोजी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, कार्यकारी अभियंता विनोद पाटील, तहसीलदार नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघूर उपसा सिंचन योजनेच्या कामांचा आढावा घेतला.
योजनेअंतर्गत 2020 शेततळ्यांचे काम वेगाने सुरू असून, शेतकऱ्यांना शाश्वत पाणीपुरवठा मिळणार आहे. परिणामी शेती अधिक फायदेशीर होईल. जिल्हा प्रशासनाने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष दिले आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंचन प्रकल्प वेगाने राबवला जात आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन उपाययोजना करत आहे.

या योजनेमुळे जामनेर तालुक्यातील शेती समृद्ध होणार असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads