वडापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

वडापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन संपन्न...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर  (मंद्रूप) : 26 फेब्रुवारी रोजी वडापूर ता. द. सोलापूर येथे जन सुविधा योजने अंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या खासदार निधीतून वडापूर या गावातील पुजारी देवस्थान घर (पुजारी गल्ली) ते प्रभू लिंग देवस्थान या रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला असुन त्या मंजूर झालेल्या कामाचे भुमिपूजन सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले 
   त्या अगोदर प्रथमता खासदार प्रणितीताई शिंदे यांचे हलगीच्या गजरामध्ये गावात स्वागत करण्यात आले व वडापूर गावच्या माजी उपसरपंच सविता विजय उर्फ तानाजी वाघचवरे यांच्या हस्ते खासदार प्रणितीताई शिंदे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
   यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, तुम्ही मला खासदार केलात प्रथमता मी तुमचे आभार मानते. पुढे बोलताना म्हणाले की ,मला तुम्ही रस्ता, पाणी, ड्रेनेज पुरत मर्यादित ठेवु नका तुम्ही मला तुमच्या सुखदुःखात पण सामील करून घ्या.
जेव्हा तुम्ही मला खासदार म्हणून मला मतदान केलात तेव्हा तुमच्या सोबत तुमच्या इच्छा आकांक्षा पण जोडल्या गेलेल्या तुमच्या गावातील कामे झाली पाहिजे, तुमचे दुःखे दूर झाले पाहिजेत यासाठी पण तुम्ही मला मतदान केलं याची मला जाणीव आहे. तुम्ही मला दिलेल मतदान मी कधीच तुम्हाला भासू देणार नाही की ते वाया गेलं की तुमच्या गावातील कोणतेही काम असो मी ते करणार असा शब्द देते तुम्ही मला खासदार केलात मी तुमचे आभारी आहे.
      यावेळी या कार्यक्रमास वडापूर गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन गणू अण्णा पुजारी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जी निकम, विश्वास घाडगे मलकारी पुजारी, अर्जुन पुजारी, लक्ष्मण पुजारी, ग्रामपंचायत सदस्य बायडा सिद्धार्थ कांबळे, नयना वाघचवरे ,बापू उर्फ नारायण पाटील, सिद्धार्थ कांबळे व तसेच मनोज येलगुलवार ,शिल्पा चांदणे, जितू वाडेकर ,पद्मिनी कारभारी, प्रमोद राऊत, दत्तात्रय काळे आदींची उपस्थिती होती 
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक साळुंखे सर यांनी केले व आभार मलकरी पुजारी यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads