जळांद्री गावातील नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ – माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
जामनेर तालुक्यातील जळांद्री गावात नव्या पुलाच्या बांधकामासाठी आज भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. जामनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण कामाचे शुभारंभ करण्यात आले. सविस्तर वृत्त -आज जळांद्रि येथे ना .श्री.गिरिषभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातुन कांग नदिवरिल दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला मोठ्या पुलाचे भूमिपूजन नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले... पुलाची लांबी 70 मिटर असून रूंदी 10मिटर आहे तसेच पुलाचा अंदाजित खर्च पाच कोटी रुपये आहे.. प्रमुख उपस्थिती नवलसिंग पाटील माजी सभापती, सरपंच पारधी, सरपंच निमखेडी,कासली, विठ्ठल पाटील, चांगदेव पाटील, ज्ञानेश्वर वरकड, खंडेलवाल, धनराज पाटील, अमोल वरकड, संभाजी पाटील, पोलिस पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी,व मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा