अरविंद देशमुख यांची कृषी औद्योगिक संघात संचालकपदी निवड... - दैनिक शिवस्वराज्य

अरविंद देशमुख यांची कृषी औद्योगिक संघात संचालकपदी निवड...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव – भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अरविंद देशमुख यांची जळगाव जिल्ह्यातील कृषी औद्योगिक संघात संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अरविंद देशमुख हे सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असून, यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा दुग्ध संघातही संचालकपद भूषवले आहे. सध्या ते नाशिक येथील नामको बँकेचे संचालक असून, त्यांनी सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अरविंद देशमुख म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील कृषी आणि उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. शेती आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील.या निवडीच्या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष रोहित निकम, ह.भ.प. जलकेकर महाराज, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, विष्णू भंगाळे, पितांबर भावसार, आरोग्य दूत शिवाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अरविंद देशमुख यांच्या नव्या जबाबदारीमुळे सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads